निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी १३ बीएलओंवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

निवडणूक विषयक कामकाजात जाणीवपूर्वक दिरंगाई आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरातील १३ बीएलओ कर्मचाऱ्यांवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती.

ज्या कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला, त्यांना १९ सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या बैठकांमध्ये तसेच व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार सूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही १३ बीएलओ कर्मचाऱ्यांनी कामात कोणतीही सुधारणा न करता सरकारी आदेशाचे उल्लंघन केले. अखेर जळगावचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

ज्या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात अर्जुन काशीनाथ ठाकरे (शिक्षक, प्रतिभा माध्यमिक विद्यालय) फारुक शहा हनीफ शहा (युनिक प्राथमिक उर्दू शाळा, मेहरूण), शुभम रमेश गजभिये (लिपिक, मनपा शाळा), हितेंद्र विलास जोशी (शिक्षक, ला. ना. विद्यालय), विकास सुकलाल चव्हाण (पद्माबाई बारकू हायस्कूल, सुप्रीम कॉलनी), हुसेन सरदार तडवी (मनपा उर्दू शाळा, सुप्रीम कॉलनी), मोहम्मद परवेज हुसेन (मनपा उर्दू शाळा), भागवत तुळशीराम भावसार (शारदा माध्यमिक विद्यालय), संजय गोपाळ चौधरी (महाराणा प्रताप शाळा), कोमल नीलकंठ तायडे (लिपिक, शासकीय तंत्रनिकेतन), कल्पेश गोपाल पवार (लिपिक, मनपा जळगाव), संजीव नामदार तडवी (शिक्षक, मुंदडा शाळा), कल्पेश यशवंत पाटील (लिपिक, जिल्हा परिषद) यांचा समावेश आहे.



Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---