नंदुरबारमध्ये महारुद्र शिवालय मंदिरातून घंटा व नागाची मूर्ती चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा…!

---Advertisement---

 

नंदुरबार शहरातील देसाईपुरा परिसरात असलेल्या महारुद्र शिवालय मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी मंदिरातील नागाची मूर्ती आणि घंटा लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

देसाईपुरा येथील कुंभार गल्ली परिसरात असलेल्या रोकडेश्वर हनुमान मंदिर आणि महारुद्र शिवालय मंदिर परिसरात ही चोरी झाली. दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सुमारे सहा किलो वजनाची पितळी घंटा आणि १६ किलो वजनाची तांब्याची नागाची मूर्ती चोरून नेली.

चोरीस गेलेल्या घंटेची किंमत सुमारे ५ हजार ४०० रुपये तर नागाच्या मूर्तीची किंमत अंदाजे १६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी अभिजीत राजेंद्र चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी नरेंद्र चौधरी करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---