NEET-UG पेपर लीक रोखण्यासाठी NTAची कडक कारवाई; परीक्षा होईपर्यंत तज्ज्ञ राहणार ‘लॉकडाऊन’….!

---Advertisement---

 

NEET-UG पेपर लीक घटनेनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि शिक्षण मंत्रालयाने येणाऱ्या परीक्षांसाठी सुरक्षा यंत्रणेत मोठे बदल केले आहेत. २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखलीजावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

NTA कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका तयार करणारे, त्याचे परीक्षण करणारे तज्ज्ञ आणि विविध भाषांमध्ये प्रश्नपत्रिकेचे भाषांतर करणारे भाषा तज्ज्ञ NEET परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईल तो पर्यंत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार आहेत. या काळात त्यांना मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही.

प्रश्नपत्रिका तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया अनेक भागांमध्ये विभागण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीकडे परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध राहणार नाही. यामुळे माहिती बाहेर जाण्याचा धोका कमी होईल, असा NTAचा विश्वास आहे.

तसेच, प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांची मदत घेण्याची तयारी करण्यात आली आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---