कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ; ‘या’ सेलिब्रिटींचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठींबा….!

---Advertisement---

 

समाज माध्यमांवर सध्या कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील तरुण मंडळी झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील तरुण असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनात पार्टीची स्थापना केली. या पक्षाची अद्याप अधिकृत कुठेही नोंद नाही.

परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसून येतो आहे. अवघ्या काही काळातच या पार्टीच्या फॉलोवर्सची संख्या कोटींच्या घरात जाऊन पोहोचली. दरम्यान आतापर्यंत कॉकरोच जनता पार्टीच सर्व काम हे ऑनलाईन पद्धतीने सुरू होतं. परंतु शनिवारी मात्र कॉक्रोरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यात आलअसलं. तरी या आंदोलनाबाबत सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान या आंदोलनाला सिने सृष्टीतुन विशाल ददलानी, प्रकाश राज, कुणाल कामरा,अली फझल, दिया मिर्झा, हातिमा सना, विजय वर्मा, अनुराग कश्यप, अतुल कुलकर्णी,हेमंत ढोमे, उर्फी जावेद,ईशा गुप्ता, कोंकोणा सेन शर्मा या सेलिब्रिटींद्वारे पाठींबा दर्शविण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---