अमळनेर- चोपडा नाका चौकात थरारक अपघात; रेती डंपरच्या धडकेत मुलगी थोडक्यात बचावली…!

---Advertisement---

 

अमळनेर शहरातील चोपडा नाका चौकात आज घडलेल्या एका अपघातात हर्षदा नावाची मुलगी सुदैवाने मृत्यूच्या दारातून बचावली. ओव्हरलोड रेती वाहून नेणाऱ्या डंपरने धडक दिल्याने ती वाहनाच्या पुढील चाकाजवळ अडकली होती. मात्र प्रसंगावधान आणि सुदैवामुळे मोठी जीवितहानी टळली.

अपघातातील जखमी हर्षदा ही आपल्या वडिलांना डबा देण्यासाठी जात असताना चोपडा नाका चौकात ही दुर्घटना घडली. भरधाव रेती डंपरने तिला धडक दिल्यानंतर काही क्षण परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर ती डंपरच्या पुढील चाकाजवळ अडकली होती.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात हर्षदाच्या डोक्याला मुका मार लागला असून तिला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातग्रस्त डंपरचा क्रमांक MH18 B2 800 असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी ओव्हरलोड रेती वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अपघातस्थळापासून पोलीस चौकी अत्यंत जवळ असतानाही सुरुवातीला पोलीस घटनास्थळी उपस्थित नसल्याची चर्चा होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

चोपडा नाका चौकातील वाढती वाहतूक, जड वाहनांची वर्दळ आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची तसेच रेती वाहतुकीवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---