खळबळजनक घटना: नवरी तिच्या प्रियकरासोबत पळाली, पतीचा लहान बहिणीसोबत विवाह ठरला; प्रेमप्रकरण उघड होताच लग्नामध्ये राडा….!

---Advertisement---

 

उत्तरप्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यात एका लग्नसोहळ्यात खळबळजनक घडामोडी घडली आहे. विवाहाच्या आदल्या रात्री नवरी प्रियकरासोबत घरातून पळून गेल्यानंतर सदर कुटुंबीयांनी तिच्या लहान बहिणीसोबत नवरदेवाचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचेही प्रेमप्रकरण असल्याची माहिती समोर आल्यानंतर लग्नमंडपातच वर वधूच्या दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर परिसरातील एका तरुणीचा विवाह जवळच्या गावातील तरुणासोबत ठरला होता. विवाहासाठी सर्व तयारी पूर्ण झालेली होती. वर आणि वधूच्या कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच विवाहाच्या आदल्या रात्री संबंधित वधू घरातून बेपत्ता झाली. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे काही कालावधीनंतर समोर आले. घरातून जाताना तिने काही दागिनेही सोबत नेल्याची चर्चा कुटुंबियांमध्ये आहे.

या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. लग्न मोडण्याची वेळ आल्याने नातेवाईक आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी केली. अनेक तासांच्या चर्चेनंतर नवरीच्या धाकट्या बहिणीसोबत नवरदेवाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि दोन्ही बाजूंनी त्यास तात्पुरती सहमती दर्शवली.

दुसऱ्या दिवशी नियोजित वेळेनुसार वरात विवाहस्थळी पोहोचली. मात्र विवाहाच्या तयारीला सुरुवात होत असतानाच पळून गेलेल्या नवरीच्या धाकट्या बहिणीचेही एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती नवरदेवाच्या कुटुंबीयांना मिळाली. तसेच तिचीही या विवाहासाठी इच्छा नसल्याचे समोर आले.

ही माहिती समोर येताच तेथील वातावरण तापले. दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू झाली आणि काही वेळातच त्याचे रूप हाणामारीत बदलले. विवाहस्थळी लाठ्या-काठ्यांचा वापर झाला तसेच दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे आनंदाचे वातावरण क्षणार्धात गोंधळ आणि तणावात तसंच हाणामारीत बदललं.

झालेल्या या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारीनंतर लग्न पूर्णपणे रद्द करण्यात आले आणि वरात वधूविनाच परतली. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---