---Advertisement---
पुण्यात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके, समाजसेवक सोनम वांगचूक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पुणेरी स्टाईल विविध प्रकारचे मजकूर लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यां द्वारे दाखवण्यात आले.
तसेच येत्या काही काळात कॉकरोच जनता पार्टीद्वारे देशातील वेगळ्या शहरानंमध्ये जसे लखनौ, अमृतसर, हैद्राबाद, बंगळुरू, जयपूर, दिल्ली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीही दिल्लीमध्ये अभिजीत दीपके यांनी अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. आंदोलनाचे वेळापत्रक ही आंदोलनकर्त्यांद्वारे देण्यात आले आहे.
20 जून रोजी नवी दिल्ली येथे पुन्हा मोठे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.









