जळगावच्या राजकारणात खलबतं, रेश्मा काळे यांचे माघारीचे संकेत? आदेश मिळताच पक्ष निर्णयाचे पालन करणार; सरिता कोल्हे यांची मोठी माहिती…!

---Advertisement---

 

जळगावात सध्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत मोठी खलबतं सुरु असून बंडखोरीचा पेच लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अद्याप पक्ष नेतृत्वाकडून अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याने त्यांची उमेदवारी कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सरिता कोल्हे यांनी दूरध्वनीवरून महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितले की, बंडखोरी मागे घेण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणताही फोन, संदेश किंवा अधिकृत संपर्क झालेला नाही. त्यामुळे सध्या रेश्मा काळे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र पक्ष नेतृत्वाकडून जो आदेश मिळेल त्याचे पूर्णपणे पालन केले जाईल. तसेच शिवसेना ही पक्षशिस्त मानणारी संघटना आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तोच अंतिम निर्णय असेल. आदेश मिळाल्यानंतर रेश्मा काळे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील आणि पक्षाच्या भूमिकेसोबत राहतील, असे त्यांनी सांगितले.

मात्र, बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा जळगावात रंगत असताना त्याबाबतही त्यांनी माहिती दिली. तांत्रिक कारणामुळे त्यांचा मोबाईल फोन बंद असण्याची शक्यता असून त्यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक विधान परिषद निवडणुकीचा संदर्भ देताना सरिता कोल्हे यांनी गोकुळ गीते यांचे उदाहरणही दिले. जसे गोकुळ गीते यांनी देखील पक्षाच्या आदेशासाठी काही दिवस प्रतीक्षा केली आणि अखेरीस पक्ष नेतृत्वाच्या सूचनांनुसार निर्णय घेतला. तसेच आम्हीही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करू, अशी भूमिका त्यांनी मांडली.

जळगाव विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर निर्माण झालेला राजकीय पेच आता पक्ष नेतृत्वाच्या एका निर्णयावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका काय राहते आणि अंतिम आदेश कधी दिला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सध्या तरी रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम असली, तरी पक्षश्रेष्ठींचा आदेश मिळाल्यानंतर जळगावातील बंडखोरीचा अध्याय संपुष्टात येण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---