शहादा पोलीस निरीक्षक, डीबी पथकाची मोठी कारवाई; दहा चाकी कंटेनर वाहनांसह ९० लाख २९ हजार रुपये विदेशी दारूचा साठा जप्त…!

---Advertisement---

 

मध्य प्रदेश राज्यातून गुजरात राज्याकडे विदेशी कंपनीचे दारू घेऊन जाणारा कंटेनर जात असल्याची गुप्त माहिती शहादा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळतात त्यांनी शहादा गुप्तचर विभागाचे पोलीस कर्मचारी यांच्यासह प्रकाशा येथे शुक्रवारी सायंकाळचा दरम्यान सापळा रचला यावेळी  वैशाली कडून अशोक लेलँड कंटेनर येत असल्याने ते वाहन थांबून त्याची चौकशी करण्यात आली वाहनांमध्ये अवैध दारू असल्याचे आढळून आले सदर वाहन शहादा पोलीस स्थानकात आणल्यानंतर त्या वाहनातून सुमारे ६५ लाख २९ हजार दोनशे रुपये किमतीचे दारू, पंचवीस लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंटेनर असा सुमारेत ९० लाख २९ हजार दोनशे रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे यासोबत कंटेनरच्या चालक व वाहक यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहादा पोलीस सूत्राकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हरियाणाहून विदेशी दारूने भरलेला कंटेनर शहादा-प्रकाशा मार्गे गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा डीबी पथकाने शुक्रवार दिनांक 19 सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान प्रकाशा परिसरात सापळा रचून संबंधित कंटेनर  वैशाली रस्त्याकडून येत असताना सदर ट्रक गुजरात राज्यात जात असताना अडवला. कंटेनर चे चालक याला कंटेनर मध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता तर त्याने वाहनांमध्ये घरगुती सामान वगैरे असल्याची माहिती दिली उत्तर देत असताना पोलिसांना त्याच्या संशय आल्याने त्यांनी वाहन बाजूला थांबून चालकाला गाडी उघडण्यास सांगितला पोलिसांकडून आलेल्या तपासणीच्यामुळे चालक व वाहक यांनी घाबरून गेल्याने वाहनांमध्ये अवैद्य दारू असल्याच्या स्पष्ट केलं यानंतर डीपी पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी सदर वाहन शहादा पोलिसात आणून सोडले रात्री उशिरा अशोक लेलँड कंटेनर मधील अवैद्य दारू याचे भरलेले बॉक्स खाली उतरवण्यात आले तपासणी केली असता कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. 

कंटेनर वाहन क्रमांक आर जी ३२ जीसी ०८१२ हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून यातील अवैद्य मध्याची सगळे बॉक्स बाहेर काढण्यात आलेली आहेत यात सात लाख वीस हजार रुपयांचे रॉयल चॅलेंजचे शंभर खोके २५ लाख वीस हजार रुपयांचे बँक कंपनीची विस्की ३५० खोके ,१९ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मॅजिक मोमेंट ग्रीन ॲपल कंपनीचे ओडका २७५ खोके, एक लाख ७२ हजार रुपये किमतीच्या मॅजिक मोमेंट जमवून स्पाइस मिट कंपनीच्या ओखा २० खोके ,एक लाख ९२ हजार स्मरण अप मेंट कंपनीच्या २५ खोके, एक लाख ४४ हजार रुपये किमतीच्या रॉक फोर्ड क्लासिक कंपनीचे २५ खोके, एक लाख ३४ रुपये किमतीच्या ब्लेंडर प्राईज सात खोके, तीन लाख १२ हजार रुपये किमतीचे मॅजिक मोमेंट ग्रीन एप्पल चाळीस खोके, असा मुद्देमाल सुमारे ६५ लाख २९ हजार रुपये दोनशे रुपये किमतीच्या माल पोलिसांनी जप्त केला आहे याच सोबत २५ लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंटेनर असा एकूण ९० लाख २९ हजार दोनशे रुपये च्या मुद्देमाल शहादा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जप्त करण्यात आलेला आहे.या कारवाईत पोलिसांनी 90 लाख 29 हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा व इतर मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये एपीआय संदीप वाघ, एएसआय चंद्रकांत देसले, पोलीस हवालदार दिपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावळे आणि कपिल मंदिर यांचा समावेश होता. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातकडे होणाऱ्या अवैध विदेशी दारू तस्करीला मोठा आळा बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---