---Advertisement---

Crime News : फसवणूक करत केला दुसरा विवाह, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

जळगाव : एकाने घटस्फोट झालेला असल्याचे भासवत एका २९ वर्षीय महिलेशी  दुसरे लग्न केले. लग्नानंतर त्यांना मुलगा झाला असता मुलाला दत्तक देण्याचा आग्रह करत तिचा छळ केल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचा पहिला विवाह २०१५ मध्ये झाला होता. यानंतर  २०२०मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांचा दुसरा विवाह २०२२ मध्ये सचिन सैंदाणे याच्या मध्यस्थीने शरद सैंदाणे यांच्या सोबात झाला.  लग्नानंतर २०२३ साली पीडितेने मुलाला जन्म दिला. संशयित शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नव्हता. परंतु, त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे भासवून दुसरे लग्न केले.

विवाहितेला झालेले मुल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. शिवीगाळ करून मारहाण केली आणि अंगावरील दागिने देखील काढून घेण्यात आले. विवाहितेला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, अशा हर्षल सैंदाणे सर्व राहणार नांदेड ता. धरणगाव, सुनील सोनवणे, रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे (सर्व राहणार जामनेर), सचिन सैंदाणे राहणार नांदेड ता. धरणगाव हल्ली मुक्काम  पुणे यांनी हा छळ व गुन्हा केला असल्याचे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणीचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---