Dhule News : समाजातील प्रत्येक घटकातील आर्थिक बाब भक्कम व्हावी यासाठी शासन बचत गटांसाठी विविध योजना राबवीत आहे. उद्योगवाढीसाठी कर्ज आणि अनुदानस्वरूपात बँकांच्या माध्यमातून बचत गटांना जोडते जात आहे. वर्तमान स्थितीत महिला बचत गट हे संघटन आणि आर्थिक व्यवहाराचा आदर्श ठरत आहेत, असे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांनी नेर येथे केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील नेर येथे नवसंजीवनी महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा व फलकाचा अनावरण सोहळा झाला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार भदाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार भदाणे यांनी सांगितले की, महिला बचत गटांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची क्षमता आहे. येणाऱ्या काळात गटांना आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे. प्रभाग समन्वयक, सीआरपी तथा गटाच्या सदस्या महत्त्वपूर्ण घटक आहेत. या घटकांच्या आधारे भविष्यात मोठे उद्योग तालुक्यात उभारू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प समन्वयक चंद्रकांत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अभियानाचे व्यवस्थापक उद्धव धारणे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, साहाय्यक गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, जिल्हा व्यवस्थापक लोकेश सोनवणे, जितेंद्र चौधरी, दीपाली पाटील, विशाल मोरे, तालुका अभियानाचे व्यवस्थापक ईश्वर पाटील, ज्योती पगार, सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, ग्रामविकास अधिकारी रेखा विसपुते, अकलाडचे सरपंच अजय माळी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा खलाणे, पंचायत समितीच्या माजी सदस्या ज्योती कपूर, ग्रामपंचायतीचे सदस्य राजधर अमृतसागर, संजय सैंदाणे, अनिल सूर्यवंशी, प्रकाश गवळे, प्रमोद साखरे, नवसंजीवनी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा अलका भोई, सचिव संगीता पाटील, कोषाध्यक्षा पुष्पा जगताप, लामकानी येथील यशोदीप प्रभाग संघाच्या अध्यक्षा प्रतिभा धिवरे, वंदना येवले, दीपाली जयस्वाल, त्रिगुणा महाले, मंगलाबाई माळी, अश्विनी माळी, गायत्री देवरे, रेणुका कुलकर्णी यांच्यासह नेर येथील महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.