---Advertisement---

खुशखबर ! इतक्या तासांत जळगाव जिल्ह्यात मान्सून होणार सक्रिय

---Advertisement---

जळगाव : यंदा लवकर दाखल झालेली ‘मान्सून एक्स्प्रेस’ काही अंशी रखडली होती. मात्र, ‘मान्सून एक्स्प्रेस’ पुन्हा रुळावर येणार असून, १२ जूननंतर जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

या अंदाजामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हाभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्यात जिल्ह्यात ७० मिमी पाऊस झाला. तर, मान्सूनच्या आगमनानंतरही काही प्रमाणातच पाऊस झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उसंत घेतल्याने आणि तापमानाचा पारा वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी शेतामधील मशागतीचे काम संपविल्यानंतर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, १२ जूननंतर जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत जून महिन्यात केवळ ७ मिमी पाऊस झाला आहे. तर, मे महिन्यात ७० मिमी पाऊस झाला होता. कृषी विभागाकडून जोपर्यंत १०० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, १२ जूननंतर जिल्ह्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर १५ जूननंतर जिल्ह्यात पेरण्यांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment