केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार‌’ प्रदान

---Advertisement---

 

जळगाव : मुंबई येथील दादर येथील अमर हिंद मंडळ या प्रतिष्ठित संस्थेतर्फे देण्यात येणारा ‌‘अमर ऊर्जा पुरस्कार 2025‌’ हा राज्यस्तरीय सन्मान जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात कोकुयु कॅम्लिनचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्रीराम दांडेकर यांच्या हस्ते संस्थेला सन्मानचिन्ह, मानपत्र व रु. 1,00,000/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातील 92 संस्थांमधून उत्कृष्ट कार्याच्या आधारे निवड होऊन केवळ पाच संस्थांमध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानचा समावेश झाला आहे.

निःस्वार्थ सेवा, सामूहिकता आणि सातत्य या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धती, समाजातील नेमक्या गरजा ओळखून त्यावर कार्य करणे तसेच अधिकाधिक लोकांना जोडत नवीन नेतृत्व घडविण्याच्या दिशेने संस्थेने केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेच्या वतीने सचिव दिलीप चोपडा, मनीषा खडके, प्रवीण देशमुख, भानुदास येवलेकर व सागर येवले उपस्थित होते.

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या या यशाबद्दल जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

दातृत्वाचा सुखद धक्का

शनिवारी (18 एप्रिल) अमर हिंद मंडळ, दादर यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानला अमर ऊर्जा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता संपला. समुह फोटोसाठी संयोजक यांनी स्टेजवर पुकारले असता सरळ साधे एक दाम्पत्य आपल्या टीमजवळ येऊन व्यवस्थित लिहिलेले दोन चेक प्रत्येकी पाच हजार रुपये मात्रचे त्यावर टिपण कागद पूर्ण पत्ता, ईमेल आदी स्पष्ट लिहून टाचणी बंद असे स्टेजच्या खालीच देते झाले. त्यांना धन्यवाद देऊन पावती पाठवतो,असे बोलणे झाल्यावर फोटोसाठी त्यांनी नकार देत रवाना झाले. हा सुखद धक्का पुरस्कारपेक्षा ही अत्याधिक उर्जा प्रदाता होय. रुपये दहा हजार दान राशीपेक्षा त्यांचा स्वयंस्फूतने व्यवस्थीतपणे सरळ भावाने दिलेली ही पाठीवरची धाप आशिर्वाद रुपी प्रेरणा आहे. अशा अनोळखी दातृत्वाला त्रिवार मानाचा मुजरा,अशी भावना केशवस्मृती समुहात उमटली.

हा प्रत्येकाचा सन्मान

  • हा जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तसेच प्रत्येक संचालक, कार्यकर्ता आणि हितचिंतक यांचा हा सन्मान आहे. आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही सामाजिक चळवळ अधिक बळकट होत असून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.
    सतीश मदाने, अध्यक्ष जळगाव जनता सहकारी बँक,लि. जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---