सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! सोने ७०० रुपयांनी तर चांदी थेट ५ हजारांनी घसरली; पहा आजचे ताजे दर

---Advertisement---

 

गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींना आज अचानक ब्रेक लागला आहे. बाजारपेठेत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली असून, चांदीच्या किमतीत तब्बल ५ हजार रुपयांची मोठी कपात झाली आहे.
​आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम (१ तोळा) ७०० रुपयांची घसरण नोंदवली गेली. या घसरणीनंतरचे दर खालीलप्रमाणे आहेत:
​विना जीएसटी दर: १ लाख ५६ हजार रुपये (प्रति १० ग्रॅम)
​जीएसटीसह (3% GST) एकूण दर: १ लाख ६० हजार ६८० रुपये
​चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची ‘महा-घसरण’
​सोन्यापेक्षा आज चांदीच्या दराने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. चांदी थेट ५ हजार रुपये प्रति किलोने घसरली आहे. नवीन दर खालीलप्रमाणे आहेत.


​विना जीएसटी दर: २ लाख ६८ हजार रुपये (प्रति किलो)
​जीएसटीसह (3% GST) एकूण दर: २ लाख ७६ हजार ४०० रुपये
​जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर होत आहे. या दरवाढीबाबत स्थानिक सराफा व्यापाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
​”जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घडामोडी, चढ-उतार तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होणारे बदल या सर्व घटकांचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहे. यामुळेच बाजारात अनिश्चितता असून आगामी काळातही हे चढ-उतार असेच कायम राहण्याची शक्यता आहे.”
— धर्मेंद्र सोनी (सोने व्यापारी)
​जर तुम्ही येत्या काळात लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारातील या दैनंदिन चढ-उतारांवर लक्ष ठेवूनच खरेदीचा निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---