जळगावात ‘सामाजिक सद्भाव बैठक’ संपन्न: कोळी समाजातील गुणवंतांचा गौरव; दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनावर मंथन

---Advertisement---

 

तुळशीलीला बहुउद्देशीय संस्था व इंदुबाई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुना असोदा रोडवरील पिवळ्या भिंती परिसरातील महर्षी वाल्मिक क्रीडांगणावर ‘सामाजिक सद्भाव बैठकी’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत समाज प्रबोधनासह आगामी राष्ट्रीय अधिवेशनाबाबत महत्त्वपूर्ण मंथन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या स्मारकाला अभिवादन करून झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भगवान कोळी होते.

​नवी दिल्ली येथे आगामी काळात ‘अखिल भारतीय कोळी समाज अधिवेशन’ आयोजित केले जाणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीबाबत आणि नियोजनाबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा व मंथन करण्यात आले. याप्रसंगी जळगावकर समाज बांधवांतर्फे प्रमुख अतिथी व गुजरातचे आमदार कन्नूभाई पटेल यांचा भव्य सत्कार करण्यात आला.


​न्यायाधीश प्रियंका संपकाळे व स्केटिंग पटूचा विशेष सन्मान
​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कोळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा झालेला सत्कार सोहळा. यामध्ये
​न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल प्रियंका संपकाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
​क्रीडा क्षेत्रात जळगावचे नाव उंचावणाऱ्या स्केटिंग पटू विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.
​यासोबतच शिक्षण, समाजकारण आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज घटकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

​या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून गुजरातचे सानंद विधानसभेचे आमदार तथा अखिल भारतीय कोळी समाज (नवी दिल्ली) युवक कार्यकारी अध्यक्ष कन्नूभाई पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.
​व्यासपीठावर अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशचे युवा अध्यक्ष ॲड. ओमप्रकाश बोईनवाड, ॲड. अमित सोनवणे, मुकेश सोनवणे, तुळशीलीला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तुषार सैंदाणे आणि इंदुबाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मंगला सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्राध्यापक रत्नाकर कोळी यांनी केले.
​या सामाजिक सद्भाव बैठकीसाठी स्थानिक परिसरातील नागरिकांसह जळगाव जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---