अखेर प्रतीक्षा संपली लवकरच मान्सून मुंबई किनारी दाखल होणार; पुढील 48 तास महत्त्वाचे……!

---Advertisement---

 

मुंबई : देशभरात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून आता मान्सून महाराष्ट्राच्याउंबरठया वर येऊन पोहोचला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून सध्या मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असून पुढील 48 तासांत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत मान्सूनने 13 राज्यांमध्ये प्रगती केली आहे. पश्चिम समुद्र किनारपट्टीवर त्याची गती कायम असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये लवकरच पावसाची सुरुवात होऊ शकते.

आतापर्यंत मान्सून कुठे पोहोचला?
मान्सूनने केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील काही भागांसह मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागां दाखल झाला असून दक्षिणेत पावसाचा जोर जास्त पाहायला मिळत आहे.

केरळ आणि कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बेंगळुरू आणि बेळगावीमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर भारतात उष्णतेचा कहर
मान्सून भारतात दाखल झाला असला तरी मात्र दुसरीकडे राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक भागांमध्ये उष्णतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतात नागरिक उकाड्याने त्रस्त होऊन मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---