---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : नवीन महिन्याची सुरुवात चांगल्या बातमीने झाली आहे. आजपासून पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. म्हणजेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
आज कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 83 रुपयांनी कपात केली आहे. यामुळे आता दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1 मे रोजी 1856.50 रुपये होती, जी आता 1 जून रोजी 1773 रुपयांवर आली आहे. तसेच मुंबईत 1725 रुपयांवर आला आहे.
याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडर सुमारे 172 रुपयांनी स्वस्त झाला होता, परंतु घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103रुपये इतकी आहे.
19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडचा दर कोलकात्यात 1875.50, मुंबईत 1725 आणि चेन्नईमध्ये 1937 प्राप्त होत आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये आज 83.50 रुपयांचा आणखी एक दिलासा मिळाला आहे. कोलकातामध्ये सिलिंडर 85 रुपयांनी स्वस्त झाला असून तो आता 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांवर आला आहे. मुंबईत तो 1808.5 रुपयांवरून 1725 रुपयांवर 83.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर चेन्नईमध्ये ते 2021.50 रुपयांवरून 84.50 रुपयांवरून 1937 रुपयांपर्यंत खाली आले आहे.