---Advertisement---
सावत्र मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचा अश्लील व्हिडिओ बनविला, एवढ्यावरच न थांबता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझा विवाह मोडेल, अशी धमकी तिच्या पित्याने दिली. धुळे तालुक्यातील वरखेडी येथील घटनेप्रकरणी पिडीत तरुणीने हिम्मत दाखवून तक्रार देताच पोलिसांनी संशयीताला तत्काळ अटक केली.
धुळे तालुक्यातील वरखेडी येथील पिडीत तरुणी गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सातच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. त्यावेळी सावत्र बाप योगेश प्रल्हाद सोनवणे तेथे आला. तो तिच्याजवळ उभे राहून आंब्याचा रस तयार करत होता. काही वेळातच त्याच्या हातातून एक काळ्या रंगाची गोळी खाली पडली. पीडितेने ती गोळी गुपचूप उचलून घेत गुंडाळून ठेवली. आंब्याच्या रसात गुंगीचे औषध टाकल्याचा संशय आल्याने तिने तो रस न खाता शेजारी मावशीला याविषयी सांगितले. रात्री ती तेथेच मावशीकडे झोपली. नराधम बापाने पीडितेच्या मोबाईलवर एक जुना अश्लील व्हिडिओ पाठविला, त्यात पीडिता गुंगीमध्ये असताना हा सावत्र बाप तिच्याशी गैरकृत्य करीत होता.
याबद्दल कुठे वाच्यता केल्यास व्हिडिओ संपूर्ण गावाला दाखवून तुझी बदनामी करेन आणि तुझे लग्न मोडून टाकीन, अशी धमकीही दिली. पीडित तरुणीने गावातील काहींच्या मदतीने धुळे तालुका पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलीस ठाण्यात (ता. २९) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. धुळ्यात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ संशयितास ताब्यात घेतले. उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.









