महिलांसाठी आनंदवार्ता! ‘या’ राज्यात 15 जूनपासून महिलांसाठी सरकारी बस प्रवास मोफत

---Advertisement---

 

केरळ सरकारने महिलांसाठी महत्त्व पूर्ण असा निर्णय घेतला आहे. केरळ राज्यातील महिलांना 15 जून 2026 पासून सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने ‘प्रियदर्शिनी’ या योजनेला मंजुरी दिली असून, यासाठी केरळ सरकारकडून दरवर्षी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) साधारण (ऑर्डिनरी) बसमध्ये विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळणार आहे. राज्यातील सर्व महिला याचा लाभ घेऊ शकतील.या लाभासाठी वय, उत्पन्न किंवा इतर कोणतीही अट लागू नसतील.

सरकारवर 800 कोटींचा खर्च
योजनेसाठी केएसआरटीसीला दरमहा 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. त्यामुळे वर्षभरात एकूण खर्च सुमारे 800 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

महिलांना होणार मोठा फायदा
या निर्णयामुळे महिलांचा दैनंदिन प्रवास खर्च कमी होणार आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच इतर कामांसाठी प्रवास करणाऱ्या महिलांना याचा मोठा लाभ मिळेल. विशेषतः ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

योजनेची महत्त्वाची माहिती
योजनेचे नाव: प्रियदर्शिनी योजना
अंमलबजावणीची तारीख: 15 जून 2026
लाभार्थी: केरळमधील सर्व महिला
मोफत प्रवास: KSRTC च्या साधारण (ऑर्डिनरी) बसमध्ये
वार्षिक खर्च: अंदाजे 800 कोटी रुपये

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---