राजकीय रणनीती की खाजगी काम? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात, दोन दिवस मुक्काम राजकीय चर्चांना उधाण….!

---Advertisement---

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आपला दिल्ली दौरा पूर्ण करून थेट आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे येथे दाखल झाले आहेत. मध्यरात्री झालेल्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांचा पुढील दोन दिवस दरे गावात मुक्काम राहणार आहेत.

दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर त्यांनी रस्त्याने दरे गाव गाठले. रात्री सुमारे २.३० वाजता ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
विकासकामांचा आढावा. हा दौरा खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात असले, तरी मुक्कामादरम्यान शिंदे दरे आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. रस्ते, पाणीपुरवठा तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित कामांची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. परिसरात सुरू असलेल्या समूह शेती आणि पर्यटन विकास प्रकल्पांबाबतही ते संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांशी संवाद
दौऱ्यादरम्यान शिंदे स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. परिसरातील समस्या, विकासकामांची स्थिती आणि स्थानिक अपेक्षा जाणून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे.

राजकीय चर्चांना उधाण
राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी सुरू असताना शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दिल्ली दौऱ्यानंतर ते अनेकदा आपल्या मूळ गावी येतात. त्यामुळे या दोन दिवसांच्या मुक्कामाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---