राज्यासह मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा कायम; उकाड्याने नागरिक हैराण…!

---Advertisement---

 

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाही मुंबईत अद्याप जोरदार पावसाची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वाढलेला उकाडा आणि हवेत असलेली आर्द्रता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मात्र, व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी आहे.आज मुंबईतील कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उष्णता आणि आर्द्रतेमुळे नागरिकांना अधिक त्रास जाणवत आहे.

हवामान विभागाने राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती यांसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सूचा पुढील प्रवास अनुकूल राहू शकतो. त्यामुळे मुंबईतही लवकरच मान्सून धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या मात्र पावसाची प्रतीक्षा कायम असून, वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---