जळगाव जिल्हा पोलीस दलाची भुसावळात पहाटे धडक कारवाई; सराईत गुन्हेगार, इराणी गँगवर एकाचवेळी छापे, गुन्हेगारांमध्ये खळबळ…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ शहर आणि परिसरात विशेष धडक मोहीम राबवली असून यात सराईत गुन्हेगार, इराणी गँग तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात मोठी कारवाई केली. भुसावळ शहरात अचानक झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस दलाच्या या विशेष मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच RCP पथकाच्या मदतीने विविध भागांमध्ये एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. गुन्हेगारांना बेसावध अवस्थेत पकडणे, त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित आणि सराईत गुन्हेगारांच्या राहत्या घरांची झाडाझडती घेतली. तसेच विविध वाहनांची तपासणी करण्यात आली. मालकीबाबत शंका असलेली आणि संशयास्पद वाहने पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.

यावेळी अनेक व्यक्तींची ओळख पडताळणी करून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली. काही सराईत गुन्हेगार आणि गुन्हेगारी नोंदी असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

यापुढे हि जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाबे चांगलेचं दणाणले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---