भुसावळजवळ ऑक्सिजन व केमिकल टॅंक असलेल्या ट्रकला भीषण आग; टँक फुटून 3 स्फोट, वाहतूक दोन तास बंद…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावाजवळ एक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऑक्सिजन आणि केमिकल टॅंक वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याने काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली.

आग लागल्यानंतर ट्रकमधील टॅंक फुटल्याने तब्बल तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे परिसरात मोठा आवाज झाला आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाच्या धोक्यामुळे जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. जवळपास दोन तास हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जामनेर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहक यांनी वेळेत ट्रकमधून खाली उतरून आपला जीव वाचवला. त्यामुळे या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी टळल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---