मंत्री नितेश राणे यांना १ लाखांच्या दंडासह १ महिन्याची कारावासाची शिक्षा, अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कोर्टाने ठरवलं दोषी…

---Advertisement---

 

भाजपाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं असून १ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला
आहे.

मंत्री नितेश राणे यांनी अधिक्याऱ्यावर चिखलफेक केलेली ही घटना ४ एप्रिल २०१९ रोजी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांच्या पाहणीदरम्यान घडली होती. त्या वेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत मंत्री नितेश राणे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ अंतर्गत दोषी ठरवले.

या चिखल फेक प्रकरणात एकूण २९ आरोपींना निर्दोष मुक्तता देण्यात आली असून, केवळ नितेश राणे यांनाच दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मात्र कणकवली न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मंत्री नितेश राणे हे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली असून, पुढील कायदेशीर लढाई उच्च न्यायालयात लढली जाईल. या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---