---Advertisement---

MLA Ram Bhadane : मंदीरांची उभारणीतून हिंदू संस्कृतीचे जतन

---Advertisement---

धुळे : हिंदू संस्कृती जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. आदर आणि सन्मान शिकवणी सोबतच उत्तम जीवन जगण्याची शैली हिंदू साहित्याने जगाला शिकवली आहे. हिंदू धर्माची शिकवण मंदिर आणि मठच्या माध्यमातून समजा पर्येंत पोहचते. हिंदू संस्कृतीचे जतन हे मंदीर उभारणीतून होत आहे. म्हणून प्रत्येक गावात मंदिर उभारणी केली पाहिजे असे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र ( राम ) भदाणे यांनी केले. तालुक्यतील उडाणे येथे श्री. गुरूदत्त व विठ्ठल मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

धुळे तालुक्यतील उडाणे येथे श्री. गुरूदत्त व विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात येत आहे. १ मे रोजी ग्रामस्थांनी भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. आयोजित कार्यक्रमात आमदार राम भदाणे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान जि प माजी अध्यक्ष धरती देवरे व उद्योजक निखील देवरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. आ. भदाणे यांनी सांगितले कि युवकांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी पुढे यावे. हिंदू धर्माप्रमाणे सण साजरे केले पाहिजे. मंदीर उभारून त्या ठिकाणी एकत्र येण्याची भावना तयार ठेवा. मंदिर हे शोभेची वस्तू न ठेवता त्यातून धर्माचा संस्कार रुजवा. यावेळी अनेक उपस्थित लोकांनी मंदीर उभारणीसाठी मदत जाहीर केली.

आयोजित या कार्यक्रमात माजी म्हाडा सभापती किरण शिंदे, जिल्हा प्रमुख शिवसेना सतिष महाले, हिलाल माळी संदीप अग्रवाल, माजी कृषी सभापती संग्राम पाटील, माजी प स सभापती प्रा. विजय पाटील, नगर सेवक संतोष खताळ, बापुजी शेलार, कृषी बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, इंजि. नरेंद्र वाघ, किशोर पवार, प्रभाकर पाटील, पोपट शिंदे उपसरपंच कमलाकर शिंदे ग्रामसेवक विश्वास बागुल, छोटू मासुळे, नवल पदमार , सुभाष शिंदे, भूषण शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment