धरणगावच्या सुरक्षिततेस नवे बळ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘मिनी फायटर’ अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण….!

---Advertisement---

 

धरणगाव शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अत्याधुनिक मिनी फायटर अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या माध्यमातून धरणगाव नगरपरिषदेला हे वाहन उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील ५४ नगरपरिषदांना अग्निशमन व रेस्क्यू वाहने देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून  धरणगावला हे अत्याधुनिक वाहन प्राप्त झाले आहे. शहरातील वाढते नागरीकरण, अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ लक्षात घेता ही मिनी फायटर गाडी धरणगावसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

धरणगाव शहरातील छोट्या गल्ली बोळांमध्ये मोठ्या अग्निशमन गाड्या पोहोचण्यास अनेकदा अडचणी येतात. मात्र ही मिनी फायटर गाडी आता शहरातील कोणत्याही भागात सहज पोहोचून आग विझवण्याचे काम वेगाने करू शकणार आहे. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरेल. फक्त आग विझवण्यासाठीच नव्हे तर पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती, रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यामध्येही ही गाडी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शासन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

या अत्याधुनिक वाहनामध्ये अग्निशमन साहित्य, बचाव उपकरणे आणि विविध आपत्कालीन सेवा साधने उपलब्ध असून त्यामुळे नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाची कार्यक्षमता अधिक सक्षम होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यास या वाहनाची मोठी मदत होणार आहे.लोकार्पणानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः वाहनात बसून गाडीची पाहणी केली व त्यातील आधुनिक सुविधांची माहिती जाणून घेतली.*

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---