---Advertisement---
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात राबविण्यात येणाऱ्या तिकीट तपासणी मोहीमेअंतर्गंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले. यात भुसावळ विभाग टीटीआय निसार खान व अॅमॅनिटी स्टाफ टीटीआय सी. पी. बडगे यांचा समावेश आहे.
विना तिकीट प्रवास आणि अनियमित प्रवासावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईने प्रवाशांमध्ये शिस्त वाढली आहे आणि प्रामाणिक प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यात आला आहे.
---Advertisement---
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांच्या नेतृत्वाखाली, भुसावळ विभागाने केवळ मे २०२५ महिन्यात तिकीट तपासणीतून ११.१९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. या काळात एकूण १ लाख १८ हजार प्रकरणांमध्ये अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्या तुलनेत मे २०२४ मध्ये ७.८२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, जी या वर्षी ४३.२२% वाढली आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत विभागाने तिकीट तपासणीतून एकूण २२.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, जे भुसावळ विभागाच्या मजबूत कार्यपद्धती आणि प्रभावी प्रशासकीय दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. एप्रिल आणि मे २०२५ मध्ये, दोन अधिकाऱ्यांनी असाधारण काम करून संपूर्ण विभागात आपला ठसा उमटवला आहे:
भुसावळ विभाग टीटीआय निसार खान यांनी एप्रिल २०२५ मध्ये १ हजार ५७७ प्रकरणांमधून २५ लाख २० हजार ९०० रुपयांची वसुली केली. मे महिन्यांत १ हजार ५९७ प्रकरणांमधून ३२ लाख ३ हजार २५० रुपयांचा महसूल गोळा केला आहे. तसेच अॅमॅनिटी स्टाफ टीटीआय सी. पी. बडगे यांनी एप्रिल २०२५: ६४९ प्रकरणांमधून १२ हजार ६८ हजार ६६० रुपयांची वसुली केले. मे २०२५ मध्ये ८५० प्रकरणांमधून १८ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
भुसावळ विभागीय प्रशासनाने या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी ते म्हणले की, हे यश विभागाच्या धोरणात्मक नियोजनाचे, सतर्क देखरेखीचे आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवाभावाचे थेट परिणाम आहे.