भुसावळात तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांची कडक नजर; रात्री अचानक होणार तपासणी, नियमभंगावर कठोर कारवाई…!

---Advertisement---

 

भुसावळ शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर आता पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार रात्रीच्या वेळी शहरात येत असल्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांकडून अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या गस्तीदरम्यान तडीपार व्यक्तींच्या घरी जाऊन ते प्रत्यक्षात शहरात उपस्थित आहेत का, याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातून एक ते दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या काही गुन्हेगारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

दरम्यान, पोलिसांनी तडीपार गुन्हेगारांची अद्ययावत यादी तयार केली असून, त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, जे तडीपार नियमांचे उल्लंघन करताना आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत माहिती दिल्यास त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---