जळगावात पोलिसांचा हॉटेल, बार आणि ढाब्यांवर एकाच वेळी छापा; एकूण २९३ ठिकाणांची तपासणी, ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री उघड….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील हॉटेल, बार आणि ढाब्यांवर एकाच वेळी छापे टाकत एकूण २९३ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यावर तात्काळ कारवाई करत ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या कारवाईत जळगाव शहरासह विविध भागातील हॉटेल, बार आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. तसेच, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही मद्यपान सुरू असल्याचे आढळून आल्याने दोन गाड्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करत ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---