कुंकू-टिळ्याला नकार, हिजाबला होकार, लेन्सकार्ट कंपनीतील नियमावरून वाद

---Advertisement---

 

नवी दिल्ली : टीसीएसच्या नाशिक कार्यालयातील धर्मांतर प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात असताना आता लेन्सकार्ट कंपनीतील ड्रोस कोडवरून वाद सुरू झाला आहे. कंपनीतील ड्रेस कोड धोरणाशी संबंधित एक दस्तऐवज उघड झाला आहे. यात महिलांना कुंकू, टिकली आणि पुरुष कर्मचाऱ्यांना टीळा लावण्यावर बंदी आहे, तर हिजाबला परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली.

स्टार्टअप कंपनी लेन्सकार्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हिजाब घालण्याची परवानगी देते, परंतु कुंकू, टिकली, टीळा लावण्यास मनाई करते. लेन्सकार्टच्या ड्रेस कोड मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित दस्तऐवज समाज माध्यमावर प्रसारित झाला असून, त्यातून ही माहिती समोर आली.

कंपनीतील एका कर्मचाऱ्याने ड्रेस कोडशी संबंधित माहिती समाज माध्यमांवर प्रसारित केली. त्यात म्हटले की, कार्यालयात कामाच्या ठिकाणी कुंकू, टिकली आणि टीळा लावण्यास बंदी आहे, तर हिजाबला परवानगी आहे. यावर, लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ पियुष बन्सल यांनी स्पष्ट केले की, कंपनीची धोरणे बदलली आहेत आणि हा दस्तऐवज त्यांच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत नाही. कंपनी नियमितपणे आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेते. संपूर्ण भारतात आमचे हजारो कर्मचारी आहेत जे दररोज आमच्या स्टोअरमध्ये आपला धर्म आणि संस्कृतीनुसार पेहराव घालतात, त्यांच्यावर कुठलेही बंधन नाही.

समाज माध्यमांवर संताप

या प्रकरणाची सुरुवात एका संदेशाच्या छायाचित्रामुळे झाली, जो सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरला. त्या संदेशात काही नियम नमूद करण्यात आले होते, ज्यामध्ये महिला, पुरुष कर्मचाऱ्यांना काही बंधने घालण्यात आली होती. तसेच काही धार्मिक पेहरान परिधान करण्याबाबतही निर्बंध असल्याचे सांगितले गेले. या माहितीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कंपनीवर टीका केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---