---Advertisement---
Jalgaon News : पुन्हा दुसऱ्यांदा एटीएम चोरी करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारांचा चोरीचा प्लॅन उधळुन लावत जळगाव एलसीबीच्या पथकाने देशभरात एटीएम चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मोबीन आत्मज मिला (वय २८, रा. बेगी नाजर ता. नकुर जि. सहानपुर, अब्दुल करीम नुर हसन (वय ५२,रा. तितरोद ता. तितरोद दोघे रा. उत्तरप्रदेश) अशी चोरट्यांची नावे आहेत. भारतातील अनेक शहरासह महाराष्ट्र, झारखंड येथे एटीएमची चोरी या टोळीने केली आहे.
शुक्रवारी (३ एप्रिल) ला शहरातील पोलन पेठेत सत्यम प्लाझा कॉम्पलेक्स येथील इक्वीटस स्मॉल बँकचे एटीएम चौघांनी चोरुन नेले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा अशाच पध्दतीने एटीएम मशीनची चोरी करण्यासाठी संशयित जळगाव येथे आल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने मंगळवारी (१४ एप्रिल) महामार्गाकडे कूच केली. मन्यारखेडाकडे जाणाऱ्या रोडवर पथकाने सापळा लावला असता दोन दुचाकीवरुन येणारे संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एटीएम चोरीत वापरलेली दुचाकी मिळुन आली होती. पोलनपेठेतील एटीएम चोरी अन्य तीन साथीदारांसह केल्याची कबुली दोघांनी दिली. एटीएमचा गुन्हा करण्यासाठी महिंद्रा पिकअप वाहन चोरल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. या संशयितांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
टोळीतील तिघे फरार
फरहान, अकबर मुजाहीद (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. बेगी ता. नकुर जि. सरहानपुर उ.प्र.अशी तिघांची नावे आहेत. या टोळीने शनिपेठ, जळगाव शहर, यवत पोलीस ठाणे पुणे ग्रामीण, झारखंडसह देशाच्या विविध भागातील एटीएमवर हात मारला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांकडून ५० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ७०० रुपये रोख ५०० रुपये किमतीचे दोन हेल्मेट असा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलीसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक सोपान गोरे, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, ग्रेपोउपनि रवींद्र नरवाडे, सहायक फौजदार अतुल वंजारी हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, लक्ष्मण पाटील, सलीम तडवी, विनोद पाटील, प्रविण भालेराव, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, पोलीस अंमलदार रवींद्र कापडणे, राहुल रगडे, सिध्देश्वर डापकर, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, छगन तायडे, हेंमत पाटील, रवींद्र चौधरी, सचिन घुगे, चालक दीपक चौधरी, बाबासाहेब पाटील, प्रवीण हिवराळे, दर्शन ढाकणे, रिझवान शेख, प्रदीप चौरे, तांत्रीक मदत गौरव पाटील, मिलींद जाधव, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, पंकज पाटील, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास यांच्या पथकाने ही कारवाई केली.









