जळगाव मनपाच्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून नोटीस, दोन दिवसात खुलासा द्या, अन्यथा…

---Advertisement---

 

जळगाव : महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख संदीप मोरे व नगरसचिव सतिष शुक्ला यांना मनपा आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून तीन दिवसाच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेचे सदस्य दिपक सुर्यवंशी यांनी हौसिंग सोयायटी येथील प्लॉट नं. ५७ समोरील इलेक्ट्रीक पोल वरील हायमस्ट लॅम्प बऱ्याच महिन्यापासून नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात दिपक सुर्यवंशी यांनी चार वेळा पत्र देवून देखील तक्रारीचे निराकरण झाले नसल्याचे त्यांनी महासभेत निदर्शनास आणून दिले होते.

सदर बाब गंभीर स्वरूपाची असून विद्युत विभागाचे सोपविण्यात आलेल्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा दिरंगाई केली असून सदस्यांचा अवमान करणारी ही घटना आहे. त्यामुळे शिस्त भंगाच्या कारवाईस तुम्ही पात्र आहे. यासंदर्भात तीन दिवसात आपला लेखी खूलासा सादर करावा अन्यथा आपणाविरूध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा विद्युत अभियंता संदीप मोरे यांना देण्यात आले आहेत.

तसेच नगरसचिव सतिष शुक्ला यांना देखील आयुक्तांनी नोटीस बजावली असून महासभेच्या अजेंड्यावर विषय नसल्यामुळे ॲड. शुचिता हाडा यांनी इतिवृत्ताचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी नगरसचिव यांनी आपल्या कार्यालयात मॅन पॉवर नसल्याचे सांगितले होते. परंतु आहे. त्या परिस्थितीत आहे, त्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे न केल्याप्रकरणी नगरसचिव सतिष शुक्ला यांना नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसात लेखी खुलासा सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---