---Advertisement---
अमरावती परतवाड्यातल्या 180 मुलींच्या लैंगिक शोषण व 350 व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणात मोठा नवीन खुलासा समोर आला आहे. अयान अहमद आणि ओझर यांच्यात पैजरुपी शर्यत लागली होती, की कोण जास्त मुली पटवणार, कोणाचा बॉडी काउंट जास्त, तसंच आपल्यापैकी कोण अधिक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकतं अशी शर्यत त्यांच्यात लागली होती. मात्र त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद निर्माण झाला आणि रागाच्या भरात उझरने लैंगिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. दोघी मित्रांच्या आपापसातील वादामुळेच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती परतवाडा येथील अयान अहमद आणि उझर या दोघी मित्रांमध्ये पैजरुपी एक शर्यत लागली होती, आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडेल, कोण जास्त मुली पटवणार या शर्यतीचे रूपांतर एका विकृतीकडे त्यांना घेऊन गेलं. आणि यातून त्यांनी पैजरुपी दोघं आपापल्या मुलींसोबतच्या लैंगिक कृत्याचं व्हिडिओ काढून ते ऑनलाइन अपलोड करायचे.
मात्र या संपूर्ण प्रकरणात यांचा परिचित एक स्थानिक राजकारणी याने महत्त्वाची माहिती दिली असून अयान आणि उझर त्या दोघा मित्रांमध्ये पैशांवरून काहीतरी वाद निर्माण झालेला होता. त्यानंतर उझरने संतापाच्या भरात ते सर्व व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केले.
रशीद नामक व्यक्तीने देखील एक महत्त्वाची माहिती दिली, यात त्यांनी सांगितलं, आम्हाला असं समजलं आहे की, अयान अहमदचे काही प्रायव्हेट व्हिडिओ हे उझरच्या अर्थात त्याच्याच मित्राच्या ताब्यात आहेत. आणि हे दोघेही एकमेकांच्या साथीने हा गुन्हा घडवत होते. आणि याच दरम्यान उझरने अयानच्या मोबाईल मधून ते प्रायव्हेट व्हिडिओ त्याच्या ताब्यात घेतले. याबद्दल मला काहीही माहिती नाही मात्र मला असं सांगण्यात आलं की, उझरने अयानकडे पैशांची मागणी केली होती, आणि अयानला पैशांची मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं, आणि म्हणून उझरने त्याला त्याचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि ही धमकी खरी करून दाखवण्यासाठी उझरने ते व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत.
या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे आरोपीची चौकशी ही पोलिसांकडनं केली जात आहे. पीडित मुलींची साक्ष मिळवण्याचं एक मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.









