गो तस्करीचे वाढते प्रकार व निद्रीस्त प्रशासकीय यंत्रणा…!

---Advertisement---

 

जिल्ह्यात चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, जामनेरसह विविध भागातून गार्थीच्या चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढते आहे. गो तस्करी करून त्यांची निर्दयीपणे वाहतूक करून अवैध मागनि वाहतूक करण्याचे प्रकार गो सेवक संघटना व काही हिंदुत्ववादी संघटनाकडून हानुन पाडले जातात. अतिशय निर्दयीपणे होणारी वाहतूक पाहून कार्यकर्त्यांचा संताप होणे साहजिक आहे.

मागे एका ट्रकमधुन शंभरावर गायींची अतिशय क्रूरपणे वाहतूक होत असताना कार्यकर्त्यांनी ट्रक पकडला… त्यातील काही गायी गुदमरून मेल्याचे आढळून आले होते. अशा प्रकार निर्दयीपणे वागणाऱ्यांना अद्दल घडवली गेलीच पाहीजे… पण काही वेळेस
आमची प्रशासकीय यंत्रणा असे प्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालते. चोपड्यात नुकताच असा प्रकार घडला. राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी पुढाकार घेऊन गो तस्करांकडून गोररक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर भूमिका घेत आंदोलन केले, मोर्चा काढला. तस्करांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस यंत्रणेचा निषेध करत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली. तक्रारीत तथ्य आढळल्याने पोलीस अधीक्षकांनी साळवेंना मुख्यालयात जमा केले व कडक हजेरी घेतली. गो तस्करी विरूद्ध आवाज उठविणाऱ्या रोहित निकम यांचे प्रथम आभार… गो तस्करी विरूद्ध असाच आवाज उठविण्याची गरज आहे. अलिकडच्या काळात गो तस्करीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होतअसल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे.

ग्रामीण भागात गोठ्यात बांधलेल्या गार्थीची रात्रीच्या अंधारात चोरी करून त्यांची खाटीकांना विक्री करणे तसेच काही ठिकाणी अवैधरित्या गोमांस प्रक्रिया करणारे खारखाने सुरू असणे ही केवळ कायद्याची पायमल्ली नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांवरही आघात करणारी बाब आहे. ग्रामीण भागात तर यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व पशुपालक असुरक्षिततेच्या छायेत दिसत आहेत. भारतीय संस्कृतीत गायीला केवळ पशू म्हणून नव्हे तर मातेचे स्थान दिले गेले

आहे. शेतीप्रधान आमच्या संस्कृतीत गायीचे आर्थिक, पर्यावरणीय आणि धार्मिक महत्व मोठे आहे. गायीचे दूध, शेण, गोमुत्र यापासून आयुर्वेदात काही औषधीही बनविली जात आहे. शेती आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत याचे महत्व मोठे आहे. त्यामुळे गायीचे संरक्षण हा केवळ भावनिक मुद्दा नसून तो आर्थिक व सामाजिक स्थैर्याशी निगडित मुद्दा आहे. अशा परिस्थितीत गो तस्करीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही स्वयंसेवी गोररक्षक संघटना पुढे येतांना दिसून आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून कधी कधी या गोरक्षकांना मदत तर नाहीच पण त्यांच्या कार्यात अडथळले निर्माण केले जात असतात, चोपड्यातील आंदोलन त्याचाच एक भाग होय. वास्तविक ही खरी जबाबदारी पोलीस यंत्रणेचीच मात्र हप्तेखोरीच्या सावटात वावरणाऱ्या या यंत्रणेकडून गो तस्करीकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे लक्षात येते. गोरक्षकांना मारहाण होणे, त्यांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न होणे ही बाब अतिशय गंभीर आहे.

चोपडा येथे घडलेली घटना याचे ज्वलंत उदाहरण आहे. गोरक्षकांना झालेली मारहाण ही संतापजनक नाही तर त्या विरूद्ध पेटून उठण्याची गरज आहे. रोहित निकम यांच्या आंदोलनात संबंधीत पोलीस निरीक्षकावर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने बदलीवर निभावले. हा उपाय तात्पुरता आहे, मुळे समस्येवर हा उपाय होऊ शकत नाही. प्रशासकीय यंत्रणेचा गाफीलपणा आणि दुर्लक्ष हे या वाढत्या प्रकारामागील प्रमुख कारण मानावे लागेल. अनेक वेळा तस्करीचे रॅकट्स उघडपणे कार्यरत असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नाही. स्थानिक पातळीवर राजकीय दबाव, भ्रष्टाचार किंवा निष्क्रियता यामुळे गो तस्करी करणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे. भ्रष्टाचारामुळे कायद्याची भीती उरलेली दिसत नाही, हेच या समस्येचे मुळ कारण आहे. प्रथम गो तस्करी विरूद्धच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहीजे. तसे झाले तर गोरक्षकांना कायदा हातात घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रशासन, समाज आणि कायदा रक्षकांनी एकत्र येऊन या विरूद्ध जागरूकपणे कारवाई करणे गरजेचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---