जळगावात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; एका दिवसात तब्ब्ल 34 जणांना चावा, बालकांसह वृद्धांवरही हल्ले; नागरिकांमध्ये भीती…!

---Advertisement---

 

जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद हा दिवसेंदिवस वाढत असून एकाच दिवशी विविध भागांत तब्बल 34 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जखमींमध्ये बालकांसह वृद्धांचाही समावेश असून सर्वांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

जळगाव शहरात दररोज सरासरी 30 नागरिकांना मोकाट कुत्रे चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार महिन्याला सुमारे 900 तर वर्षभरात तब्बल 10 हजारांहून अधिक डॉग बाईटच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

जळगाव शहरातील अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. शाळकरी मुले, सकाळी फिरायला जाणारे नागरिक तसेच वृद्ध व्यक्तींना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दुचाकीस्वारांवरही कुत्र्यांनी झडप घातल्याच्या घटना घडत आहेत.

याबाबत डॉक्टरांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कुत्रा चावल्यानंतर घरगुती उपचार करण्याऐवजी जखम तात्काळ स्वच्छ पाण्याने धुवून जवळच्या रुग्णालयात जावे. वेळेत उपचार आणि अँटी-रेबीज लस घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तातडीने निर्बीजकरण मोहीम आणि पकड मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---