जळगाव– छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात ; १ जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी….!

---Advertisement---

 

जळगाव– छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जामनेर तालूक्यातील पाळधी गावाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झळा असून तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. अपघातात उत्तम परदेशी (५४) जागीच ठार झाले असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्तारोको आंदोलन केल्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पाळधी गावालगत महामार्गावर वाहने नेहमीच सुसाट असतात. आज दुपारी एका भरधाव वाहनाचा अचानक ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात उत्तम परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

पाळधी गावानजीक झालेल्या या भीषण अपघातानंतर पाळधीतील ग्रामस्थांचा संयम सुटला असून, संतप्त नागरिकांनी महामार्गावर ‘रास्तारोको’ आंदोलन केलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी मागणी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय पाळधी परिसरात लवकरात लवकर गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसवण्यात यावे, तसेच महामार्गालगत वाढलेली सर्व अतिक्रमणे काढण्यात यावी. भविष्यात अशी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---