दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली; दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार…!

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा म्हणजेच SSC Result 2026 आज, शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांसाठी एकाच वेळी प्रसिद्ध केला जाणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण विभागातील विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत.

यंदाही राज्य मंडळाने निकाल प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत दहावीचा निकाल प्रसिद्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यामध्ये एकूण निकालाची टक्केवारी, विभागनिहाय निकाल आणि इतर महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?

विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाईट्सवर आपला निकाल पाहू शकतात :
sscresult.mahahsscboard.in⁠
Maharashtra State Board Official Website⁠
DigiLocker Results⁠
MKCL Result Portal⁠
Target Publications Results⁠
Navneet Result Portal⁠

असा पाहा तुमचा SSC Result 2026

सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
होमपेजवर ‘SSC Result 2026’ या लिंकवर क्लिक करा
तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
.त्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
काही सेकंदांत तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
निकालाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा.

ऑनलाईन मिळणारे गुणपत्रक हे तात्पुरते असणार आहे. अधिकृत मार्कशीट विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत नंतर दिली जाणार आहे. त्यामुळे निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया आणि करिअर नियोजनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---