एकत्र दारू पिली, वाद झाला आणि मित्राची निघृण हत्या केली, मृतदेह रेल्वे रुळावर फेकला; बांभोरी परिसरात खळबळ…!

---Advertisement---

 

धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाची निघृण हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाळधी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मयत तरुणाचे नाव पिंटू आमशा बारेला (वय ३५, रा. बरेली, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे आहे. पिंटू हा आपली पत्नी सखुबाई आणि सहकारी सुनील बारेला यांच्यासोबत बांभोरी शिवारातील रेल्वे पुलाखाली झोपडी करून राहत होता. रेल्वे रुळावर पडलेले प्लास्टिक गोळा करून तो आपला उदरनिर्वाह करत असे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २२ मार्च रोजी रात्री पिंटू आणि सुनील यांनी एकत्र दारू पिली होती. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या सुनीलने पिंटूला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर हा अपघात वाटावा, या उद्देशाने सुनीलने पिंटूचा मृतदेह जवळच असलेल्या रेल्वे रुळावर फेकून दिला.

सोमवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने पाळधी स्टेशन मास्तरांना माहिती दिली. स्टेशन मास्तरांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्राला कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नव्हती, मात्र काही वेळाने पिंटूची पत्नी सखुबाई यांनी मृतदेह आपल्या पतीचा असल्याचे ओळखले.

सखुबाई यांनी सुनील बारेला यानेच आपल्या पतीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. यावरून पोलिसांनी सुनीलला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पाळधी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---