---Advertisement---
नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा सूड घेण्यासाठी सख्ख्या काकूनेच तिच्या 7 वर्षांच्या पुतण्याचा अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला अडकवण्यासाठी पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून पोलिसांनी आरोपी महिला अनिता स्वामीला अटक केली आहे.
सदर घटना आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथे घडलेली. 19 एप्रिल रोजी सात वर्षांच्या देवांश स्वामी या चिमुरड्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली घटनेमुळे लातूर जिल्ह्यात हळहळ उडाली. यातील सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे सख्ख्या काकूनेच पुतण्याचा का दाबून खून केल्याचा तपशील समोर आला आहे.
लातूरच्या चाकूर येथील रहिवासी असलेल्या आरोपी महिला अनिता स्वामी हिच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. आणि यामुळेच दोघांमध्ये सतत वाद निर्माण व्हायचे. अनिताने ठरवलं की तिच्या पतीच्या गर्लफ्रेंडला आता धडा शिकवायचा आणि तिला कायदेशीर अडकवायचं. त्यामुळे तिने स्वतःसह दिराच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला आणि संतापात तिच्या सात वर्षीय पुतण्याचा खून केला. पुतण्याचा कोणाचा आरोपीने तिच्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंड वर लावून तिला अडकवण्याचा प्लॅन रचला. आणि हत्तीचा गुन्हा लपवण्याच्या कारणाने आरोपी अनिता स्वामी हिने तिच्या पुतण्याचा मृतदेह आहे एका पडीत वाड्यात फेकून दिला. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
घटना घडली त्या दिवशी चाकूर येथे राहणाऱ्या साईचरण दिनेश स्वामी (वय 10) देवांश मंगेश स्वामी (वय 7) हे सख्खे चुलत भाऊ सकाळी सात वाजेच्या सुमारास बाहेर खेळण्यासाठी गेलेले होते. मात्र बराच काळ ओलांडल्यानंतर दोघेही भाऊ भरे परितले नाही त्यामुळे मृत्यू चिमुरड्याचे वडील मंगेश स्वामी यांनी पोलिसांना मुले पेपरचा झाल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी तात्काळ परिसरात चिमूरड्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र दुपारी दीड वाजेच्या सुमारास परिसरात असलेल्या महादेव मंदिराजवळ एका पडक्या जागेमध्ये ट्रॅक्टरच्या आडोशाला देवांश स्वामी याचा मृतदेह आढळून आला. या संपूर्ण घटनेने स्वामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









