संस्कार संस्कृती फौंडेशनचा अभिनव उपक्रम, गरजूंना वाटप केल्या वह्या

जळगाव : संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने गौतमनगर तांबापुरामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम रविवारी (२२ जून ) रोजी पार पडला. यावेळी आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, आरपीआय (आठवले पक्षाचे) जळगाव युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते जमील शेख, खरात गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जे. डी. भालेराव,समाज कार्यकर्ते रियाज काकर, सामाजिक कार्यकर्ते असिफ शेख, आरपीआयचे युवक महानगर अध्यक्ष शुभम पारधे, सामाजिक कार्यकर्ते सोनू कडक, सामाजिक कार्यकर्ते इस्माईल खान, अविनाश पारधे, पंकज सोनवणे,अक्षय मेघे आदी उपस्थित होते.


यावेळी आमदार भोळे यांनी संस्कार संस्कृती फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या वह्या वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मिलिंद सोनवणे आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे आवर्जून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या वह्या वाटपाचा कार्यक्रम घेत असल्याने संस्थेच्या पदाधिकारी यांचे कौतूक केले.

यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य मीराबाई सोनवणे, रत्नाबाई सोनवणे, रत्ना ब्राह्मणे, आशा पारधे, भावना अडकमोल, मोहिनी पारधे, बेबाबाई सपकाळे, कलाबाई पारधे, पद्माबाई पारधे, सरस्वताबाई नन्नवरे, शालुबाई शिंदे, नागेश वारुळे, प्रविण वाघ, सतीश सोनवणे, मंगल वाघ, राजा संदाशिव, चेतन ससाणे, संजय पारधे, गजानन ससाणे, विनोद अहिरे, करण आहिरे, मुकेश सपकाळे, दिनेश सोये, मंगल खैरनार, भगवान ससाणे, राहुल खैरनार, प्रेम पारधे, आर्यन वाघ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment