---Advertisement---
जळगाव : येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातर्फे इको क्लब उपक्रम अंतर्गत सीड्स (बीज गोळे) बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा इको क्लबचे प्रमुख कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी मार्गदर्शनात पार पडली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सीड्स बॉल कसे बनवावे तसेच सीड्स बॉलचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून सीड्स बॉल बनवून घेतले. या उपक्रमात इ. 5 वी ते 7वीच्या विद्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेतला. जळगाव सिटी स्मार्ट सिटी….जळगाव सिटी ग्रीन सिटी …. झाडे लावा, झाडे जगवा ..च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्याना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाड लावून आपल्या चांगल्या भविष्याची तरतूद करावी तसेच आपण लावलेल्या झाडाचे भविष्यातील फायदे असे आपल्या भाषणात शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी सांगितले.
मागील वर्षी मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरामध्ये ‘इको क्लब ‘ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमात पर्यावरणाचे धडे देण्याबरोबरच विद्यार्थी शाळेत व परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करणार आहे. या झाडांना विद्यार्थ्याची नाव,आईचे नाव व त्यांच्या वर्गाची नाव लिहुन झाडाजवळ पाटी लावली आहे.
---Advertisement---

या उपक्रमांतर्गत इको क्लब मिशन प्रमुख शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर ,इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे, इको क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष व इयत्ता 1ली ते 7 वीचे प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्याची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, कचरा कमी करणे, ऊर्जा संवर्धन व पाण्याची बचत करणे,प्लास्टिक वापर टाळणे ,वृक्षारोपण या संकल्पनावर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
इको क्लबचा माध्यमातून इको क्लबचे समन्वयक, उपक्रमशील शिक्षक,चित्रकार सुनिल दाभाडे यांनी मातीपासून सीड बॉल बनवून त्यात पेरु,आंबा,चिंच ,निम,सिताफळ, जांभुळ अशा अनेक फळ झाडांचा बियांपासून 600-700 मातीचे सीड बॉल बनवून नदी किनारी, डोंगर भागात ,परिसरातील रस्ताचा किनारी टाकण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे, इको क्लबचे विद्यार्थी मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे व इको क्लबचे सदस्य उपस्थित होते.
इको क्लब ची स्थापना झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी इको क्लब टिमचे अभिनंदन केले.