---Advertisement---
संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी हे कायम आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. कर्जत मध्ये देखील त्यांनी एक वादग्रस्त विधान केलेल आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल बोलताना ते म्हटले की शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असं वादग्रस्त विधान संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजींनी केले आहे.
आता भिडे गुरुजींच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, कर्जत येथील लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी ते आले असता त्यांनी कर्जत येथे हे विधान केलं आहे.
शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. राज्याला अशी कीड लागली असून, लवासाची ही कीड काढून टाकू असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता.









