---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या इराणी महिला फरनाज रेझा यांची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सदर महिलेला 6 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला पाठवण्यात येणार आहे. महिलेचे इमिग्रेशन पूर्ण होऊन तिला विमानात बसवण्यापर्यंत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तिच्यासोबत राहणार आहे.
धरणगाव येथील कुरेशी वस्तीत गेल्या एक वर्षापासून ही इराणी महिला आपल्या मुलांसह वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते.
यानंतर सदर महिलेला जळगाव येथील शासकीय आशादीप वसतिगृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी इराणी दूतावासाशी संपर्क साधण्यात आला असता, दूतावासाने महिलेला परत बोलावण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. त्यानुसार आता 6 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने फरनाज रेझा यांची इराणला रवानगी करण्यात येणार आहे.









