भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी !

---Advertisement---

 

पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील सुनावणीदरम्यान एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे हे न्यायालयात गैरहजर राहिले. कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे न्यायालयाने ही अनुपस्थिती गंभीर मानत थेट अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला. मात्र, खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे सुनावणीला उपस्थित होते.

भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्याविरोधात यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खडसेंनी विशेष पीएमएलए न्यायालयात अपील दाखल केले होते, मात्र ते अपील न्यायालयाने फेटाळून लावले होते.

6 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात आरोप निश्चित होण्याची प्रक्रिया होणार होती. मात्र मुख्य आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने कठोर भूमिका घेत अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या कायदेशीर तसेच राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार असून, न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---