तेलंगणातील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा जामनेरमध्ये तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

---Advertisement---

 

तेलंगणा राज्यात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून करण्यात आलेली विटंबना ही अत्यंत निंदनीय व बहुजन समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप करत, या घटनेच्या निषेधार्थ आज जामनेर शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सत्यशोधक समाज संघ व शिव-फुले-शाहू-आंबेडकरांसह वैचारिक संघटनांतर्फे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर विटंबना ही अत्यंत निंदनीय व समाज मन दुखवणारी असल्याचा आरोप या संघटनांकडून करण्यात येत आहे.

मोर्चाची सुरुवात जामनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नतमस्तक होऊन मोर्चा हा तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. तहसील कार्यालयात जामनेर तहसीलदारांना या बाबतचे निवेदन सादर करून तेलंगणातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

महात्मा फुले यांसारख्या समाजसुधारकांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटना घडवून आहेत यासाठी प्रभावी बंदोबस्त व उपाययोजना करण्याची मागणी यावेळी संघटना तर्फे करण्यात आली.

हा निषेध मोर्चा जामनेर तालुक्यातील बहुजन समाजातील फुले प्रेमी यांच्यासह समता फुले परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष पवन माळी, क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक उत्तमराव पवार, नगरसेवक अतिश झाल्टे, महेंद्र बाविस्कर, बाबुराव घोंगडे, अरुण महाजन, ए.डी. माळी, एस.पी.महाजन, प्रल्हाद बोरसे, पहुर उपसरपंच राजू जाधव यांच्या सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते. तसंच सत्यशोधक समाज संघाचे रमेश दादा वराडे, कैलास महाजन, जे.बी. चौधरी, गोरबंजारा क्रांती संघाचे धनराज चव्हाण, माळी समाजाचे राजू जगताप, गजानन अहिरे, समाजसेवक सारंगधर अहिरे, बाळू चवरे, योगेश झाल्टे, दीपक माळी यांच्यासह बहुजन समाजातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

महात्मा फुले यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही अशा स्टेट इशारा देत दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी व शिक्षा देण्याची मागणी ही आंदोलन कर्त्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---