नंदुरबारमध्ये नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी; १० लाखांचा ऐवज लंपास…!

---Advertisement---

 

नंदुरबार: शहरातील गणपती चौक परिसरात एका नगरसेवकाच्या बंद घरच्या खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १० लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक लालचंद कटारीया (वय ५५, रा. ८६ गणपती चौक, नंदुरबार) हे व्यवसायाने व्यापारी असून नगरसेवक आहेत. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० वाजेपासून ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:४५ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील बेडमध्ये ठेवलेली लोखंडी डिजिटल तिजोरी आणि चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी एकूण १०,१३,८०० रुपयांचा माल लंपास केला आहे, ज्यामध्ये सुमारे २८ तोळे ३ ग्रॅम वजनाचे दागिने (ज्यामध्ये जेन्ट्स चैन, लेडीज चैन, डायमंड लॉकेट, सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या आणि सोन्याचे कॉइन्स यांचा समावेश आहे). सुमारे १२२५ भार वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू (पायातील जोडवे, चांदीचे ग्लास, लक्ष्मी-गणपतीच्या मूर्ती आणि चांदीचे कॉइन्स), तिजोरीमध्ये असलेली ८,४५,००० रुपयांची रोख रक्कम आणि आरमा कंपनीची ४० हजार रुपये किमतीची डिजिटल तिजोरी आदी वस्तूंचा समावेश आहे:

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे. भरवस्तीत आणि लोकप्रतिनिधीच्या घरात झालेली ही धाडसी चोरी पाहता परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---