व्यापाऱ्यांला लुटणाऱ्या चोरट्यांना रावेर पोलिसांकडून अटक; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात किराणा व्यापाऱ्याच्या वसुलीचे पैसे लुटीचा गुन्हा उघड करण्यात येथील गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले. यात तिन जणांना अटक करून पन्नास हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार दि. १८ रोजी रावेर शहरातील अनिल सुपारी भांडार किराणा दुकानचे मालक गोवर्धनदास सफरमल कोटवानी हे त्यांच्या दुकानाची वसुली करण्यासाठी  विवरा येथे गेले होते. रात्री साडे आठ वाजेचे सुमारास वसुली करून रावेर येथे येण्यासाठी विवरा बस स्टॉपवर येऊन ते बसची वाट पाहत होते. यावेळी त्यांना एका मोटरसायकल स्वाराने मी रावेरला जात आहे असे सांगून त्यांना मोटरसायकलवर बसवले. रस्त्यात पारश्याच्या नाल्याजवळील शेतात लघु शंका करण्याचे कारण सांगून मोटार सायकल शेत रस्त्याकडे नेली. यापूर्वीच दोन साथीदार त्या ठिकाणी उभे होते. तिघांनी मिळून गोवर्धनदास कोटवाणी यांच्या खिशातील वसुलीचे पैसे जबरदस्तीने हिसकाऊन काढून घेतले व तेथून पोबारा केला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले. पोलिस पथकाने गुन्ह्यांचा तपास चालु असतांना गुप्त बातमी दारामार्फत आरोपीची माहीती मिळवली. आरोपींचा शोध घेवुन आरोपी मोहम्मद उबेद मोहम्मद एजाज रा. नागझिरी चौक रावेर, शेख मोईन शेख नईम व रेहानखान जावेद खान दोघेही रा. विवरे बु॥ (ता. रावेर) यांना ताब्यात घेऊन अटक केली. चोरीस गेलेले रोख १५ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली ३५ हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल (क्र.एम एच-०२-सी एन-५३७६  ) असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
सदरची कार्यवाही  पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी चोपडा अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल मोरे, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.कॉ. सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विशाल पाटील, विकार शेख, संभाजी बिजागरे, श्रीकांत चव्हाण, गजानन बोने यांच्या पथकाने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---