जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; या स्थानकांदरम्यान धावणार ५ नव्या रेल्वे….!

---Advertisement---

 

होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ३० विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथून सुलतानपूर, वाराणसी, रक्सौल, सहरसा आणि धनबाद या प्रमुख स्थानकांदरम्यान धावणार आहेत. विशेष म्हणजे काही गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस- सुलतानपूर विशेष गाडी

क्र. ०४२११ : २७ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी मुंबईहून सुटेल.
क्र. ०४२१२ : २६ फेब्रुवारी व २ मार्च रोजी सुलतानपूरहून सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी विशेष गाडी

क्र. ०४२२५ : २६ फेब्रुवारी व २ मार्च रोजी मुंबईहून सुटेल.
क्र. ०४२२६ : २५ फेब्रुवारी व १ मार्च रोजी वाराणसीहून सुटेल.

या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, झाशी, कानपूर आणि लखनौ या स्थानकांवर थांबा असेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल

क्र. ०५५५८ : १२ मार्च ते २ एप्रिल, प्रत्येक गुरुवारी.
क्र. ०५५५७ : १० मार्च ते ३१ मार्च, प्रत्येक मंगळवारी.
(एकूण ८ फेऱ्या)

लोकमान्य टिळक टर्मिनस- सहरसा

क्र. ०५५८६ : ८ मार्च ते २९ मार्च, प्रत्येक रविवारी.
क्र. ०५५८५ : ६ मार्च ते २७ मार्च, प्रत्येक शुक्रवारी.
(एकूण ८ फेऱ्या)

लोकमान्य टिळक टर्मिनस- धनबाद

क्र. ०३३८० : १२ मार्च ते २६ मार्च, प्रत्येक गुरुवारी.
क्र. ०३३७९ : १० मार्च ते २४ मार्च, प्रत्येक मंगळवारी.
(एकूण ६ फेऱ्या)

होळीच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांची सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा रेल्वे चौकशी केंद्रावरून वेळापत्रकाची खातरजमा करून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---