हरताळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा हैदोस; बिबट्याने वळूचा पाडला फडशा….!

---Advertisement---

 

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक ६६ मधील शेतकरी अशोक बालचंद्र धबाडे यांच्या मालकीच्या शेतात घुसून बिबट्याने बांधलेल्या वळूवर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली.

माहितीनुसार, जंगलालगत असलेल्या शेतात वळू बांधलेला असताना बिबट्याने अचानक झडप घातली. रात्रीच्या वेळी जनावरांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेतकरी घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत वळूचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पाहणीनंतर हा हल्ला बिबट्याने केल्याची खात्री करण्यात आली असून परिसरात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व एकट्याने बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

दरम्यान, गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी जिल्हा वनसंरक्षक राम धोत्रे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे हरताळा परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---