अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक आरोप; रोहीत पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात ?

---Advertisement---

 

राज्यात गाजत असलेल्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आता एक नवा आणि धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणावरून आधीच राजकीय वातावरण तापले असताना आता भाजप युवा मोर्चाने थेट आमदार रोहित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे.

रोहित पवार यांनी या विमान दुर्घटनेबाबत सातत्याने संशय व्यक्त करत हा अपघात नसून घातपात असू शकतो असा दावा केला आहे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी वारंवार केली आहे.

मात्र आता भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी एक नवा आरोप करत रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या म्हणण्यानुसार, या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरात त्या दिवशी दृश्यता कमी झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विमानाला अडचण निर्माण झाली आणि अपघात घडला असावा, असा दावा त्यांनी केला आहे.

यासंदर्भात वैभव सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रात कारखान्यामुळे परिसरात प्रदूषण वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या धुरामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या समस्या निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या आरोपांना रोहित पवार यांनी स्पष्टपणे फेटाळले आहे. हे आरोप पूर्णपणे राजकीय द्वेषातून केले जात असून त्यामागे कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच आता अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---